सांताक्रूझ येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा पाटपूजन सोहळा संपन्न


सांताक्रूझ येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा पाटपूजन सोहळा संपन्न

मुंबई | प्रतिनिधी-: मुंबईत मुसळधार पावसाची संततधार सुरू असतानाही सांताक्रूझ (पूर्व) येथील वाकोला परिसरातील स्वामी विवेकानंद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी (५०व्या) वर्षानिमित्त आयोजित पाटपूजन सोहळा उत्साहात पार पडला. संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या सोहळ्यास गणेशभक्तांची उपस्थिती होती.सन १९७७ मध्ये वाकोला परिसरातील ३२ चाळी व समित्यांनी एकत्र येऊन या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. तेव्हापासून मंडळामार्फत दरवर्षी गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. परिसरात हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यरत आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ५० किल्ल्यांवर जाऊन तेथील माती संकलित केली असून, यंदाच्या गणेशमूर्तीच्या निर्मितीत त्या मातीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. पाटपूजन सोहळ्यात साई श्रद्धा नाशिक ढोल-ताशा पथक, सांताक्रूझ आर्टिस्ट बेंजो तसेच गिरगावचे वादक मिलिंद यांनी सादरीकरण केले. यावेळी उपस्थित गणेशभक्त आणि कार्यकर्त्यांनी सोहळ्यात सहभाग नोंदविला.


81
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!