मुंबई | प्रतिनिधी-: राष्ट्रीय चर्मकार संघाच्या नव्याने नियुक्त मुंबई प्रदेश महिला कार्याध्यक्ष डॉ. पायल राजेंद्र खरे आणि दक्षिण-मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष जगन्नाथ धामापूरकर यांच्या पुढाकाराने नायगाव, दादर येथे राष्ट्रीय चर्मकार संघाच्या शाखेचे उद्घाटन व फलक नामकरण सोहळा उत्साहात पार पडला. दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता १३५, नवाब चेंबर्स, जी. के. रोड, प्रभाकर हॉटेलजवळ, नायगाव, दादर (मुंबई) येथे आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष राजेश खाडे तसेच मुंबई प्रदेशाध्यक्ष विलास गोरेगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई प्रदेश महासचिव गणेश खिल्लारे, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष हंसराज रेगर, समाजसेवक संजय चव्हाण, मुंबई प्रदेश महिला महासचिव मितालीताई सोनवणे, समाजसेविका अनिताताई चव्हाण, राहुल हजारे, संत रोहिदास नवपरिवर्तन सेनेचे संस्थापक/अध्यक्ष व जनता प्रभाव न्यूजचे संपादक ईश्वर विलास ताथवडे तसेच समाजातील अनेक कार्यकर्ते, समाजबंधू व भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमात समाज संघटन, शैक्षणिक प्रगती, युवक सक्षमीकरण आणि सामाजिक ऐक्य यांसंदर्भात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय चर्मकार समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी अशा शाखांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभलेल्या अक्षरश्री विलास देवळेकर यांनी आपल्या “इको साऊंड सिस्टीम”च्या माध्यमातून डॉ. पायल खरे यांच्या नाम अक्षरावर नामफलक शुभेच्छा कविता सादर केली. उपस्थितांनी या कवितेला उत्स्फूर्त दाद दिली. शाखा उद्घाटन व फलक नामकरण सोहळ्यामुळे परिसरातील समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून राष्ट्रीय चर्मकार संघाच्या सामाजिक कार्याला अधिक बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय चर्मकार संघ शाखा उद्घाटन व फलक नामकरण कार्यक्रम उत्साहात संपन्न
- जाहिरात
- नवीनतम पोस्ट
- POLL

