बालहक्कांच्या जनजागृतीसाठी भाकर फाउंडेशनचा पुढाकार; १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान ‘बाल अधिकार सप्ताह २०२६’चे आयोजन


चला, बालस्नेही प्रभाग निर्माण करूयात!मुंबई-:गोरेगाव, मुंबई : बालकांचे हक्क, संरक्षण, सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य, पोषण आणि सामाजिक सहभाग यांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने भाकर फाउंडेशनच्या वतीने १४ नोव्हेंबर (बाल दिन) ते २० नोव्हेंबर (बाल अधिकार दिवस) या कालावधीत ‘बाल अधिकार सप्ताह २०२६’ आयोजित करण्यात आला आहे.या सप्ताहाच्या माध्यमातून बालकांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच समाजामध्ये बालहक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहे.

चित्रकला, हस्तकला आणि शैक्षणिक उपक्रमांची मेजवानी-: सात दिवसीय बाल अधिकार सप्ताहात बालकांसाठी चित्रकला, हस्तकला, पर्यावरण आणि आरोग्यविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय बालकांना शासकीय यंत्रणांच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती मिळावी, यासाठी पोलीस ठाणे, महानगरपालिका विभाग कार्यालय आणि अग्निशमन केंद्राला शैक्षणिक भेटी देण्यात येणार आहेत.

अंगणवाडी सेविका,पालक आणि महिला कार्यकर्त्यांसाठी विशेष सत्रे-: बालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला राजकीय कार्यकर्त्या तसेच पालकांसाठी विशेष जनजागृती व माहिती सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सत्रांमध्ये बाल अधिकार, बालकांचे संरक्षण आणि बाल संरक्षण यंत्रणांविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

बालस्नेही समाजनिर्मितीचा संकल्प-: बालकांचा सामाजिक सहभाग वाढवणे, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आणि बालकांना सुरक्षित, आनंदी व सन्मानपूर्वक वातावरण उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. बालकांचे हक्क केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष जीवनातही त्यांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याचे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

“बालकांचे हक्क जपूया, सुरक्षित बालपण घडवूया!”

आयोजक : भाकर फाउंडेशन-गोरेगाव (पश्चिम), मुंबई.

जनता प्रभाव न्यूज-आवाज लोकशाहीचा!! प्रभाव जनतेचा!!!

www.jantaprabhavnews.co.in


88
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!