विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर
मुंबई, दि. २३ : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला पहिल्या दिवशी विधान परिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती सभापती प्रा. राम शिंदे यांनी जाहीर केली.
तालिका सभापती म्हणून सदस्य प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजीत वंजारी, सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सभापती प्रा. शिंदे यांनी जाहीर केले.
Views: 2

