वाशिष्टी धरणातील गाळ उपसा तातडीने करावा-पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी


वाशिष्टी धरणातील गाळ उपसा तातडीने करावा-पंचक्रोशीतील नागरिकांची मागणीप्रतिनिधी-:पोफळी गावाजवळील वाशिष्टी नदीवरील वाशिष्टी धरणामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होत असून दरवर्षी उन्हाळ्यात परिसरातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर धरणातील गाळ उपसा तातडीने करण्यात यावा, अशी जोरदार मागणी पंचक्रोशीतील नागरिकांकडून होत आहे.स्थानिक नागरिकांच्या मते,धरणातील साचलेल्या गाळामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा कमी होत आहे. गाळ उपसा केल्यास धरणाची क्षमता वाढून अधिक पाणी साठवता येईल.त्याचा फायदा पोफळीसह आसपासच्या गावांतील हजारो नागरिक,शेतकरी आणि व्यापारी वर्गाला होणार आहे. तसेच भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन विहिरी व बोअरवेलमध्येही पाणी टिकून राहण्यास हातभार लागेल.

सध्या वाढत्या उष्णतेमुळे आणि अनियमित पावसामुळे पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे.त्यामुळे प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाशिष्टी धरणातील गाळ उपशाचे काम तातडीने हाती घ्यावे,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.”धरणातील गाळ काढल्यास भविष्यातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि पंचक्रोशीतील गावांना दिलासा मिळेल,”असे मत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे शासनाने निधी उपलब्ध करून लवकरात-लवकर गाळ उपशाचे काम सुरू करावे,अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


82
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!