लोकप्रेरणा जनसेवा गौरव पुरस्काराने महादेव चव्हाण यांचा सन्मान
प्रतिनिधी-:चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पोफळी गावचे रहिवासी महादेव दाताराम चव्हाण यांना लोकप्रेरणा जनसेवा गौरव पुरस्कार २०२६ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
व्हिजन ३ न्यूजतर्फे दहशतवाद विरोध दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यात समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महादेव चव्हाण यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. सामाजिक बांधिलकी, जनसेवा आणि विविध सामाजिक उपक्रमांमधील त्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी आमदार शेखर निकम यांनी महादेव चव्हाण यांचे अभिनंदन करत समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना अशा पुरस्कारांमुळे नवी प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. पोफळी गावासाठी ही अभिमानाची बाब असून चव्हाण यांच्या सन्मानामुळे परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महादेव चव्हाण यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.


