डिजिटल बाजारपेठेची कवाडे खुली! केंद्र सरकारच्या एनएसआयसी-ओएनडीसीच्या विशेष कार्यशाळेत एमएसएमई उद्योजकांना व्यवसायवृद्धीचे ‘डिजिटल मंत्र’


डिजिटल बाजारपेठेची कवाडे खुली! केंद्र सरकारच्या एनएसआयसी-ओएनडीसीच्या विशेष कार्यशाळेत एमएसएमई उद्योजकांना व्यवसायवृद्धीचे ‘डिजिटल मंत्र’मोफत नोंदणी, ऑनलाइन मार्केटिंग, ब्रँडिंग, वित्तपुरवठा आणि जागतिक बाजारपेठेतील संधींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन; १०० हून अधिक उद्योजकांचा उत्स्फूर्त सहभागमुंबई | प्रतिनिधी-:डिजिटल अर्थव्यवस्थेच्या युगात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय लघु उद्योग निगम लिमिटेड (एनएसआयसी) आणि ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित ‘एमएसएमई ट्रेड इनेबलमेंट अँड मार्केटिंग’ या विशेष शासकीय मार्गदर्शन कार्यशाळेला महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील १०० हून अधिक उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, स्वयंशक्ती स्त्री उद्यमी फाउंडेशन, इनोव्हारी वुमेन्स मेंटोरिंग अँड इनोव्हेशन हब, एसएनडीटी ‘वाईस’ इनक्युबेशन सेंटर आणि चेनेलियर यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यशाळेत उद्योजकांना डिजिटल माध्यमातून व्यवसाय विस्तारासाठी आवश्यक असलेल्या विविध शासकीय योजना, आधुनिक विपणन तंत्रे आणि ऑनलाइन व्यापाराच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.’एमएसएमई टीम’ उपक्रमांतर्गत शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर पूर्णपणे मोफत नोंदणी, उत्पादनांचे प्रभावी ब्रँडिंग, आकर्षक पॅकेजिंग, बी-टू-बी आणि बी-टू-सी ऑनलाइन मार्केटिंग, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये सहभाग, ट्रेडमार्क, बारकोड तसेच विविध शासकीय अनुदान योजनांची माहिती उद्योजकांना देण्यात आली. उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजकांनी या मार्गदर्शनाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात एनएसआयसी, नवी मुंबई शाखेचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक राजेंद्र सिंह जादौन यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. एनएसआयसी, मुंबई विभागाचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक डी. डी. माहेश्वरी यांनी केंद्र सरकारच्या उद्योगाभिमुख योजनांचा आढावा घेत एमएसएमई क्षेत्रासाठी उपलब्ध संधी स्पष्ट केल्या. एमएसएमई-डीएफओच्या सहाय्यक संचालिका माथुरिया आय. के. यांनी उद्योगविकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय धोरणांची माहिती दिली.त्यानंतर इनोव्हारी वुमेन्स मेंटोरिंग अँड इनोव्हेशन हबचे संस्थापक-संचालक विश्राम बापट आणि एसएनडीटी ‘वाईस’ इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. सचिन लढ्ढा यांनी नवउद्योजकांसाठी उपलब्ध संधी, स्टार्टअप्स आणि डिजिटल व्यवसायवृद्धीवर मार्गदर्शन केले.तांत्रिक सत्रात एनएसआयसीचे व्यवस्थापक चिरो सुमित यांनी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली. स्वयंशक्ती स्त्री उद्यमी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. दिपाली चांदक यांनी ‘एमएसएमई स्कीम्स अँड टीम इनिशिएटिव्ह’ या विषयावर उद्योजकांसाठी उपलब्ध विशेष संधींवर प्रकाश टाकला. सिडबीचे सहाय्यक महाव्यवस्थापक (एजीएम) दिविक साहनी यांनी एमएसएमई वित्तपुरवठा आणि बँकिंग योजनांचे मार्गदर्शन केले, तर चेनेलियरचे संचालक सिद्धार्थ दास यांनी बी-टू-बी आणि बी-टू-सी ऑनलाइन व्यवसाय साखळीचे प्रभावी सादरीकरण केले. यावेळी एमएसएमई टीम उपक्रमावर आधारित माहितीपटाचेही प्रदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एमएसएमई डेस्कच्या वरिष्ठ व्यवस्थापक गौरी बैरागी यांनी केले, तर एनएसआयसीचे व्यवस्थापक कुलदीप मिश्रा यांनी आभार प्रदर्शन केले.‘जनता प्रभाव’ विशेष-:डिजिटल तंत्रज्ञान, शासकीय योजनांचा प्रभावी वापर आणि ई-कॉमर्सच्या संधींचा लाभ घेतल्यास भारतीय एमएसएमई उद्योगांना देशांतर्गतच नव्हे, तर जागतिक बाजारपेठेतही नवी ओळख निर्माण करता येऊ शकते, असा विश्वास या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला.

@NSIC #Mumbai Workshop, @ONDC MSME Workshop, @MSME Trade Enablement and Marketing, @Digital Marketing for MSME, @NSIC ONDC Maharashtra, @MSME Schemes India, Online Marketing Workshop Mumbai, @Janta Prabhav News.


81
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!