धारावीच्या वीज वितरणावर अदानीची नजर-:बेस्टचा विरोध, धारावीकरांच्या हिताचा प्रश्न ऐरणीवर!


धारावीकरांच्या माथी आणखी एक निर्णय लादणार का? पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर वीज वितरणाचा नवा वाद; स्वस्त वीज, अखंड सेवा आणि ग्राहकांच्या हक्कांबाबत नागरिकांचे प्रश्न!

धारावी विशेष वृत्त | मुंबई

मुंबई-: धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा आधीच चर्चेत असताना आता धारावीच्या वीजपुरवठ्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने धारावी परिसरात वीज वितरण करण्यासाठी आपल्या परवान्यात बदल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने वीज वितरणाच्या अधिकाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, धारावीमध्ये वर्षानुवर्षे वीजपुरवठा करणाऱ्या बेस्ट उपक्रमाने या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे अदानी विरुद्ध बेस्ट असा संघर्ष निर्माण झाला असून या संपूर्ण प्रकरणात धारावीकरांच्या हिताचे काय, हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.

अदानीच्या प्रस्तावाला बेस्टचा आक्षेप; ८७ हजार ग्राहकांचा मुद्दा!

बेस्टच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, धारावी परिसरात बेस्टचे सुमारे ८७ हजार वीज ग्राहक आहेत. या परिसरात बेस्टने अनेक वर्षांत वीज वितरणासाठी मोठी पायाभूत यंत्रणा उभारली आहे. त्यामध्ये वीज उपकेंद्रे, रिसिव्हिंग स्टेशन्स आणि भूमिगत केबल नेटवर्कचा समावेश आहे.अदानी इलेक्ट्रिसिटीला धारावीत वीज वितरणाची परवानगी मिळाल्यास बेस्टच्या विद्यमान ग्राहकांवर आणि उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता असल्याची भूमिका बेस्टने मांडली आहे. बेस्टने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे आपली हरकत नोंदवली आहे.

धारावीकरांच्या मनात असंतोष-वीजपुरवठ्याबाबत अनेक प्रश्न!

धारावीचा पुनर्विकास हा केवळ इमारतींचा विषय नसून लाखो नागरिकांच्या घरांचा, रोजगाराचा आणि भवितव्याचा प्रश्न आहे. पुनर्विकासाबाबत स्थानिक रहिवाशांनी यापूर्वीही पारदर्शकता आणि नागरिकांच्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे.

आता वीज वितरणाच्या नव्या प्रस्तावामुळे नागरिकांसमोर आणखी काही प्रश्न उभे राहिले आहेत.

धारावीकरांना वीज वितरण कंपनी निवडण्याचा पर्याय मिळणार का?

नव्या व्यवस्थेमुळे वीजदरात बदल होणार का?

विद्यमान वीज ग्राहकांचे मीटर आणि कनेक्शन यांचे काय होणार?

लघुउद्योग, कारखाने आणि व्यावसायिकांना परवडणारी वीज मिळणार का?

बेस्टच्या विद्यमान पायाभूत सुविधांचे भवितव्य काय?

वीज वितरणाचा निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक रहिवाशांचे म्हणणे ऐकले जाणार का?

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष–अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अर्जावर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून सूचना, हरकती आणि अभिप्राय मागविण्यात आले आहेत. आयोगाच्या अधिकृत सार्वजनिक सूचनेनुसार हा अर्ज प्रकरण क्रमांक १६३/२०२५ अंतर्गत नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम निर्णय आयोगाच्या प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

जनता प्रभावचा रोखठोक सवाल- धारावीचा विकास कोणासाठी आणि कोणाच्या अटींवर?

धारावीकरांना विकासाच्या नावाखाली केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष सुविधा हव्यात. घरांचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, लघुउद्योगांचे अस्तित्व आणि आता वीज वितरणाचा प्रश्न अशा प्रत्येक बाबतीत स्थानिक नागरिकांचे हित केंद्रस्थानी असले पाहिजे. वीज वितरणाच्या बाजारपेठेत कंपन्यांमध्ये स्पर्धा असणे हा नियामक प्रक्रियेचा भाग असू शकतो; मात्र त्या स्पर्धेचा आर्थिक भार सामान्य ग्राहकांवर पडता कामा नये.

बेस्टची भूमिका, अदानीचा प्रस्ताव आणि धारावीकरांच्या मूलभूत गरजा या तिन्ही बाबींचा निष्पक्ष विचार होणे आवश्यक आहे.

धारावीकरांना अंधारात ठेवून धारावीचा विकास होऊ नये! वीज कोणाचीही असो, अधिकार ग्राहकांचा असला पाहिजे!

जनता प्रभाव न्यूजचा जनहिताचा सवाल-:धारावीकरांच्या हिताचा निर्णय कधी?

आवाज लोकशाहीचा!! प्रभाव जनतेचा!!! जनता प्रभाव न्यूज | मुंबई

www.jantaprabhavnews.co.in


अतिशय अर्थपूर्ण, चिंतनशील आणि वर्तमान वास्तवावर भाष्य करणारी ही कविता आहे. सदानंद खोपकर यांनी ‘अंधारानंही आता समजून चालावं’ या ध्रुवपदातून बदलत्या समाजव्यवस्थेवर, मानवी प्रवृत्तीवर, भूक, कष्ट आणि निसर्गाच्या परिवर्तनशील चक्रावर प्रभावी भाष्य केले आहे.

88
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

अतिशय अर्थपूर्ण, चिंतनशील आणि वर्तमान वास्तवावर भाष्य करणारी ही कविता आहे. सदानंद खोपकर यांनी ‘अंधारानंही आता समजून चालावं’ या ध्रुवपदातून बदलत्या समाजव्यवस्थेवर, मानवी प्रवृत्तीवर, भूक, कष्ट आणि निसर्गाच्या परिवर्तनशील चक्रावर प्रभावी भाष्य केले आहे.

error: Content is protected !!