अतिशय अर्थपूर्ण, चिंतनशील आणि वर्तमान वास्तवावर भाष्य करणारी ही कविता आहे. सदानंद खोपकर यांनी ‘अंधारानंही आता समजून चालावं’ या ध्रुवपदातून बदलत्या समाजव्यवस्थेवर, मानवी प्रवृत्तीवर, भूक, कष्ट आणि निसर्गाच्या परिवर्तनशील चक्रावर प्रभावी भाष्य केले आहे.


अंधारानंही आता समजून चालावं

उराशी कवटाळून कोणी बसणार नाही,

लोक आता अंधाराला सरावलेत

आता दिवसा कृष्णकृत्य ठसठशीत होतात

अन् भुकेची ठिणगी, भडकून

कष्टाची दिशा दाखवते

अंधारानंही आता समजून चालावं..

भवताल आता सावध होत आहे

हर एक जीव जंतू, बदलत्या मानवाकडे लक्ष देऊन आहे

स्वशैली बदलून घेत आहे

मानवाचेच जीवजंतू होणार

हे तो समजून चालला आहे

अंधारानंही आता समजून चालावं..

कशापायी विश्रामाची प्रतीक्षा करावी

उजेडच आता समर्थ झाला आहे

घडावयाचे ते घडणार आहे

अगणित चक्रांची ही सृष्टी,

तमा नाही त्यांना अंधारयुगाची,

ती फिरतच राहाणार आहेत

अंधारानंही आता समजून चालावं

लेखक -जेष्ठ पत्रकार-: सदानंद खोपकर

संपर्क-+9920156352


अतिशय अर्थपूर्ण, चिंतनशील आणि वर्तमान वास्तवावर भाष्य करणारी ही कविता आहे. सदानंद खोपकर यांनी ‘अंधारानंही आता समजून चालावं’ या ध्रुवपदातून बदलत्या समाजव्यवस्थेवर, मानवी प्रवृत्तीवर, भूक, कष्ट आणि निसर्गाच्या परिवर्तनशील चक्रावर प्रभावी भाष्य केले आहे.

88
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

अतिशय अर्थपूर्ण, चिंतनशील आणि वर्तमान वास्तवावर भाष्य करणारी ही कविता आहे. सदानंद खोपकर यांनी ‘अंधारानंही आता समजून चालावं’ या ध्रुवपदातून बदलत्या समाजव्यवस्थेवर, मानवी प्रवृत्तीवर, भूक, कष्ट आणि निसर्गाच्या परिवर्तनशील चक्रावर प्रभावी भाष्य केले आहे.

error: Content is protected !!