न्यू इंग्लिश स्कूल पोफळी संकुलात योग दिन उत्साहात साजरा


न्यू इंग्लिश स्कूल पोफळी संकुलात योग दिन उत्साहात साजरा

पोफळी चिपळूण-: न्यू इंग्लिश स्कूल पोफळी संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अलोरे येथील मल्लखांब, योगा व मार्शल आर्ट प्रशिक्षक योगेश शिंदे उपस्थित होते. तसेच माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सोनल गमरे मॅडम, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक महेंद्र कापडी, शिशुविहार विभागप्रमुख सुप्रिया वारे तसेच शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सूर्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी शिशुविहार, प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक प्रदीपकुमार यादव यांनी केले. प्राथमिक विभागाचे क्रीडा शिक्षक अशोक मिसाळ यांनी विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कारासह पद्मासन, वज्रासन, भुजंगासन, ताडासन, शलभासन तसेच विविध योगासने करून घेतली.यावेळी महेंद्र कापडी सर यांनी विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे महत्त्व पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांकडून प्राणायामाचा सरावही करून घेतला. प्रदीपकुमार यादव यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास, उद्देश व महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे योगेश शिंदे यांनी योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, असे सांगून विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.शेवटी मुख्याध्यापिका सोनल गमरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व समजावून सांगत मार्गदर्शन केले. योगाभ्यासामुळे निरोगी जीवनशैली विकसित होते, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित योग करण्याचा संदेश दिला.सर्व विद्यार्थ्यांना राजगिरा लाडू खाऊ म्हणून देण्यात आला.हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक,मानसिक व आध्यात्मिक प्रगतीकडे नेणारा ठरला. विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण झाली असल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


82
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!