मुंबई-:कोण आहे नितीन गोर्डे….?
आधुनिक भास्कर वाघ तर नाही ना
म्हाडा मध्ये भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार करणारे अधिकारी काही कमी होताना दिसत नाही….!
ह्याचे जिवंत उदहारण म्हणजे नितीन गोर्डे….
नोव्हेंबर 2021 मध्ये झाले ला हा अधिकारी हा म्हाडा ची सूत्र हाताळत असलेल्याच्या अनेक तक्रारी ह्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेला व्यक्तीवर आहेत…. एक सेवानिवृत्त अधिकारी म्हाडा मधील रिपेअर बोर्ड येथे एका विशिष्ट पदावर वर्षावर्षे काम केल्या नंतर ही कोणत्या ना कोणत्या मार्गाने म्हाडाच्या CO ह्यांच्या दालनात कार्यभर सांभाळत असल्याचे समझते व
अश्या ह्या अधिकाऱ्यांवर अनेक तक्रारी करून ही म्हाडा चे वरिष्ठ अधिकारी सांभाळणारे ह्या निवृत्त अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचे काम करताना दिसत आहेत… शेवटी हा विषय विधानसभेत सलग 2 वर्ष सानमांनीय आमदार 2023 कैलास गोरंट्याल यांना मांडला त्यावर कारवाईचे आश्वासन देत त्याला म्हाडा मध्ये कार्यकाल संपल्यानंतर काम करण्यास मज्जाव केला गेला.. तरी ते आदेश म्हाडा ने पाळले नाहीत… परत हा विषय विधानसभेत 2025 मध्ये सन्मानीय आमदार राजेश राठोड ह्यांनी मांडला कि बडतर्फ करून ही कोणाच्या जीवावर आणि देखरेखी खाली नितीन गोर्डे ह्या म्हाडा मध्ये कार्य करत आहे… त्यावर देखील शासनाने त्यावर कारवाई करत त्याला म्हाडा मधून बडतर्फ केल्याचे आदेश दिले…. पण सदर व्यक्ती आज देखील म्हाडा मध्ये काम करताना दिसत आहे….ह्याहुन अधिक धकादायक म्हणजे सूत्रांच्या माहिती अनुसार सदर व्यक्ती मुंबई ची हायपॉवर समितीची मीटिंगजी मुंबई महानगर पालिका दालनात
गेल्या 2 ते 3 वर्षात पार पडली त्यावेळी देखील सदर व्यक्ती त्या मीटिंगला म्हाडाचे प्रतिनिधित्व केल्याचे समझते….सदर व्यक्तीवर एवढी मेहेरबानी कोणाची ह्याचा खुळासा झाला पाहिजे….. आणि अश्या व्यक्तीन मुळे प्रामाणिकपणे म्हाडा चे इतर अधिकारी ह्यांना अश्या घटनामुळे भ्रष्टाचारचे प्रोत्साहन धडे दिले जातं आहे का?
माहितीच्या अधिकाराला म्हाडा मध्ये केराची टोपली तर खरी माहिती दडपली जाऊन नागरिकांना नितीन गोर्डेची दिशाभूलची टोपी..!!माहितीच्या अधिकारामध्ये माहिती देणारे व्यक्ती अधिकृत आणि पारदर्शकता ठेवत आहेत का.? असा प्रश्न म्हाडा मधील भोंगळ कारभारामुळे जनमाणसात उपस्थित झाला असून माहिती अधिकारी सुद्धा नितीन गोर्डेला वाचवण्याचा प्रयत्न का करत आहेत? माहितीच्या अधिकारी गोर्डे संदर्भात माहिती देणारे सुद्धा त्यांचेच नातलग तर नाहीत ना असा देखील प्रश्न अधिक संशय नागरिकांमध्ये निर्माण झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे तर भ्रष्टाचार आणि अनधिकृत पणे वावरकरणाऱ्यांना म्हाडा वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत असल्यामुळे मिलिंद शंबरकर हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करता का आहेत? त्यांच्याच दालनात हा व्यक्ती ऍक्टिव्ह असलेल्याचे समझते… माहिती अधिकार खाली सी. सी टी व्ही फुटेज सुद्धा सामन्य जनतेला दिले जातं नाही…यामुळे देखील संशयाची पाल म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सभोवताली अधिक वेगाने भिरभिरू लागली असल्याचे सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.
79/ए अंतर्गत एन ओ सी साठी किती फाईल नितीन गोर्डे ह्यांनी हाताळ्या ह्या मध्ये नितीन गोर्डे ह्यांच्याशी संभदीत किव्हा नातेसंभंध, हीतसंभंध तर नाहीत ना?ह्याचा तपशील ही कार्यालय तसेच अधिकारी दडपवून ठेवत आहेत ….कोणासाठी आणि कोणत्या बिल्डरसाठी चांगल्या इमारती देखील जर जर दाखवण्याचे काम त्या कार्यालयात राहून नितीन गोर्डे करत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळून,भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसे गोळा करण्याचे सरांस काम नितीन गोर्डे आणि असे अनेक अधिकारी छुप्या रीतीने करत आहेत आणि माहिती लपवत आहेत आणि शंबरकर आणि विजिलन्स कोणाच्या दबावाखाली त्यांना पाठीशी घालत आहेत का ? वांद्रे खोली क्रमांक 476 मध्ये ह्या व्यक्तीचे अधिक वावर खुले आम दिसत आहे हे
म्हाडा मधून निलंबित व्यक्ती म्हाडा मध्ये दरोझ सामान्यांना म्हाडा सेक्युरिटी च्या प्रक्रियेतून जनतेची जशी आधार कार्ड पॅनकार्ड इत्यादी ओळख पत्र बघून कोणास भेटायचे आहे काय काम आहे असे विचारपूस करून सोडले जाते तसेच नितीन गोर्डे ला देखील एन्ट्री दरोझ घेतली जातं आहे का? भ्रष्टाचाराचे रॅकेट कुठपर्यंत आहे? याची सखोल चौकशी सी बी आय मार्फत सरकार करणार कि आपल्याच दालनातील अधिकारी बचाव करतील? म्हणून समस्त जनतेचे लक्ष लागून आहे.
खासगीत अनेक म्हाडाचे अधिकारी ह्या व्यक्तीमुळे होणारा मानसिक त्रास कामात अडथळे निर्माण होवून म्हाडाची प्रतिमा मलिन होत आहे अशी चर्चा होताना दिसत आहे…..
अशा ह्या सगळ्या प्रकारत आता तरी स्वतः उपमुख्यमंत्री आणि ह्या विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे ह्या प्रकरणात ठोस निर्णय घेतील का? हा जनतेचा प्रश्न आहे… कि नितीन गोर्डे आणि त्यांना अशा प्रकारे पाठीशी घालणारे अधिकारी ह्यांच्यावर देखील कारवाई उपमुख्यमंत्री करतील अशीच जनतेची अपेक्षा आहे….¡¡







