एमएसएमई उद्योजकांसाठी जुहू येथे केंद्र सरकारकडून राष्ट्रीय लघु उद्योग निगम तर्फे शासकीय मार्गदर्शन कार्यशाळेचे विनामूल्य आयोजन


एमएसएमई उद्योजकांसाठी जुहू येथे केंद्र सरकारकडून राष्ट्रीय लघु उद्योग निगम तर्फे शासकीय मार्गदर्शन कार्यशाळेचे विनामूल्य आयोजन

ऑनलाइन मार्केटिंग आणि विविध शासनाच्या योजना व संधींवर विनामूल्‍य मार्गदर्शन, २४ जूनला आयोजन

मुंबईः सध्याच्या स्पर्धात्मक युगात आपल्या उद्योगाचे मार्केटिंग करताना सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योजकांना विविध आव्‍हानांना सामोरे जावे लागते. अशा उद्योजकांसाठी विनामूल्‍य स्‍वरुपात विशेष शासकीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. बुधवारी, दिनांक २४ जून २०२६ रोजी मुंबईतील जूहू भागातील एसएनडीटी महिला विद्यापीठातील सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे.

 

 

 

नॅशनल स्‍मॉल इंडस्‍ट्रीज्‌ कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएसआयसी), केंद्र सरकारचे एमएसएमई, ओपन नेटवर्क फॉर डिजीटल कॉमर्स (ओएनडीसी), इनोव्‍हेशन ॲण्ड मेंटोरींग हब, चेनेलियर, स्‍वयंशक्‍ती स्‍त्री उद्यमी फाउंडेशन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, वाईस यांच्‍या सहकार्याने ही कार्यशाळा होते आहे. या कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या उद्योजकांना ‘एमएसएमई टीम’ योजनेच्या अंतर्गत विविध बाबींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर उद्योजकांना पूर्णपणे मोफत नोंदणी करता येईल. उत्पादनांच्या योग्य व आकर्षक पॅकेजिंगसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि मदत दिली जाईल. ‘बिझनेस-टू-कंझ्युमर’ (बी टू सी) आणि ‘बिझनेस-टू-बिझनेस’ (बी टू बी) मार्केटिंगची मोफत संधी उपलब्ध करून दिली जाईल. विविध व्यावसायिक प्रदर्शनांमध्ये विनामूल्य सहभागी होण्याची संधी मिळेल. ट्रेडमार्क, बारकोड आणि शासकीय अनुदान यांबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. या कार्यशाळेत सर्व प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग (उत्पादन) आणि सर्व्हिस (सेवा) सेक्टरमधील उद्योजक या योजनेचा आणि कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकतात. या कार्यक्रमासाठी जागा मर्यादित असल्यामुळे नाव नोंदणी आवश्यक आहे. तसेच, कार्यक्रमाला येताना सोबत उद्यम सर्टिफिकेट आणणे बंधनकारक आहे. इच्छुक उद्योजकांनी अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी 8484898466, 8484990541, किंवा 9403278366 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


82
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!