डोंबिवलीच्या ‘शोरमा गर्ल’ची राज ठाकरेंसोबत शिवतीर्थावर भेट; मनसेप्रमुखांनी घड्याळाची भेट नाकारत केली शोर्माची मागणी


डोंबिवलीच्या ‘शोरमा गर्ल’ची राज ठाकरेंसोबत शिवतीर्थावर भेट; मनसेप्रमुखांनी घड्याळाची भेट नाकारत केली शोर्माची मागणी

​मुंबई-:सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवलेली डोंबिवलीतील ‘शोरमा गर्ल’ एकता सावंत हिने नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. इन्स्टाग्रामवर ‘शोरमा गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या एकताचे लाखो चाहते आहेत. ती डोंबिवलीच्या रस्त्यावर शोरमा विक्रीचा व्यवसाय करते. मात्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून तिच्या स्टॉलवर वारंवार कारवाईचा बडगा उभारण्यात येत होता. या कठीण प्रसंगी मनसे नेते अविनाश जाधव यांनी पुढाकार घेत तिला आधार दिला. त्यांनी तिला थेट राज ठाकरे यांचे छायाचित्र असलेला एक नवीन स्टॉल व्यवसायासाठी उपलब्ध करून दिला. या घटनेनंतर एकताच्या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली असून.​महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या या अनमोल मदतीमुळे एकताचा थांबलेला व्यवसाय पुन्हा एकदा जोमाने सुरू झाला. याच सहकार्यासाठी आभार व्यक्त करण्यासाठी एकताने राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली. राज ठाकरेंची भेट घेताच तिने त्यांना फुलांचा गुच्छ दिला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी तिने मनसेप्रमुखांसाठी भेटवस्तू म्हणून एक घड्याळ आणले होते.तिने घड्याळाची पिशवी त्यांच्या हाती दिल्यावर त्यांनी आत काय आहे अशी विचारणा केली. एकताने घड्याळ असल्याचे सांगताच, राज ठाकरे यांनी अतिशय मिश्किल अंदाजात तिला सांगितले की, “मला घड्याळ नको, तू मला मस्तपैकी शोरमा घेऊन ये.” असे म्हणत त्यांनी ती भेटवस्तू तिला परत केली. या संवादानंतर एकताने शर्मिला ठाकरे यांचीही आवर्जून भेट घेतली.एकता सावंत ही मूळची डोंबिवलीकर असून तिथेच ती आपला शोरमाचा व्यवसाय चालवते. शहरातील रस्त्यावर ती आपला स्टॉल लावते. काही पालिका अधिकारी जाणीवपूर्वक फक्त आपल्याच स्टॉलवर कारवाई करतात आणि इतर फेरीवाल्यांकडून पैसे उकळून त्यांना सोडून देतात, अशी उघड तक्रार तिने केली होती. तिने यासंदर्भात बनवलेला व्हिडीओ पाहून मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी स्वतः डोंबिवलीत धाव घेतली होती. त्यानंतरच त्यांनी तिला राज ठाकरे यांचे छायाचित्र असलेला मनसेच्या माध्यमातून नवा स्टॉल मिळवून दिला आहे.


62
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!