MHT-CET 2026 मध्ये ढगे केमिस्ट्री क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश ९० विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधिक पर्सेंटाइल; ८ विद्यार्थ्यांची ९९ पेक्षा अधिक पर्सेंटाइलची कामगिरी


अहिल्यानगर | जनता प्रभाव-: MHT-CET 2026 परीक्षेत अहिल्यानगर येथील ढगे केमिस्ट्री क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परीक्षेच्या निकालात संस्थेतील तब्बल ९० विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवले असून, ८ विद्यार्थ्यांनी ९९ पेक्षा अधिक पर्सेंटाइल प्राप्त केले आहेत.यामध्ये तनमय रोकडे (९९.८८ पर्सेंटाइल), श्रद्धा काळे (९९.८१), मयुरेश शिंदे (९९.७७), ऋतुराज रोकडे (९९.५२), ओंकार जवक (९९.५१), खुशी गुगळे (९९.२५), मयूर पानमंद (९९.०२) आणि श्रेया घोलप (९९.०१ पर्सेंटाइल) या विद्यार्थ्यांनी विशेष यश मिळवले. या यशानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे आणि दयान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाला आमदार संग्राम भैय्या जगताप, महापौर ज्योतीताई गाडे आणि उपमहापौर धनंजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. नितीन पी. शेरजे, उपप्राचार्य डॉ. डी. जी. भालके, अधिष्ठाता डॉ. पुष्पराज वारके, डॉ. सुशील एस. बेनके (पीएच.डी. केमिकल बायोलॉजी, आयसर पुणे; सदस्य, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, इंग्लंड) तसेच डॉ. डी. बी. करंजुळे (सिनियर लेक्चरर, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, अहिल्यानगर) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका पाटील शेळके यांनी केले. यावेळी प्रा. प्रभाकर गवांदे, प्रा. विवेक चौधरी आणि प्रा. सुरेश जावळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी युवराज महांडुळे, मोनाली पवार आणि मेधा बासकर यांनी सहकार्य केले. यावेळी प्रा. प्रमोद ढगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


81
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!