झोपडपट्टी सुधार मंडळातील “कंत्राटा”साठी गोळीबार..!!


झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
खासदार-आमदारांच्या निधीतून लोकोपयोगी कामे करण्यासाठी मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळातून वितरित केली जाणारी कोट्यवधी रुपयांची कंत्राटे मिळविण्यासाठी कंत्राटदार कुठल्याही थराला जात असल्याचे एका प्रकरणातून उघड झाले आहे.

मुंबई-: खासदार-आमदारांच्या निधीतून लोकोपयोगी कामे करण्यासाठी मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळातून वितरित केली जाणारी कोट्यवधी रुपयांची कंत्राटे मिळविण्यासाठी कंत्राटदार कुठल्याही थराला जात असल्याचे एका प्रकरणातून उघड झाले आहे. झोपडपट्टी सुधार मंडळातील टक्केवारी ही नेहमीच चर्चेचा विषय राहिली असून आताही ही कंत्राटे मिळविण्यासाठी ठराविक कंत्राटदारांनी प्रतिस्पर्ध्याला हवेत गोळीबार करून धमकावल्याचे प्रकरण पुढे आले आहे. विशेष म्हणजे झोपडपट्टी सुधार मंडळातील अभियंत्यांकडून संबंधित कंत्राटे प्रलंबित ठेवून अप्रत्यक्षपणे अशा कंत्राटदारांना मदत केली जात असल्याचा आरोपही केला जात आहे.


57
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!