चर्मकार समाजाचे अशोक (आबा) खाडे यांना भारत सरकारचा २०२६ चा पद्मश्री पुरस्कार जाहीर..!!


चर्मकार समाजाचे अशोक (आबा) खाडे यांना भारत सरकारचा २०२६ चा पद्मश्री पुरस्कार जाहीर..!!

 

याचे सर्वत्र कौतूक होत आहे.हा सन्मान आबाच्या रुपाने एका श्रमिकाच्या श्रमाच्या घामाचा सन्मान आहे.पिढ्यानू पिढ्या दुःख ,दारिद्र्य,अज्ञानाच्या शापीत चर्मकार समाजातील कष्टाचा सन्मान ठरला आहे…! पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या स्वप्नील तरूणाईस उर्जा देणारा ठरला आहे. मुंबईत रस्त्याकडेला गटई करणारे वडील, गावात दुसर्‍याच्या शेतात खुरपणारी आई, डाकयार्डात राब-राबणारा मोठा भाऊ यांचे हात आणि मन आज कृत-कृत झाले असणार.कारण “आपला हात जगन्नाथ” करून स्वतःच्या हाताने स्वताचे नशीब लिहणारा पडे गावचा अशोक खाडे आज पद्मश्री झाला आहे …! मुंबईच्या ज्या बोटीच्या धक्क्यात ज्या मुलाने कामगार म्हणून कामाची सुरवात केली तिथे,ते मुल एक यशस्वी करोडपती उद्योजक झाले… ज्या माऊलीने त्या मुलांसाठी ज्या रानात खुरपले तिच्यासाठी ते रानच त्याने खरेदी केले. जगभरात आपल्या कंपन्या मार्फत ५०० कोटी रूपयापेक्षा जास्त व्यवसाय आणि ४५००० लोकांच्या हाताला काम देणारा हा नामवंत उद्योजक नायक आहे. ज्या घराण्यात करोडपती व पद्मश्री म्हणजे लक्ष्मी व सरस्वती एकत्र निवास करतात ते घराणे व ते गाव तो समाज हे देशाचे भुषण आहे.भारत बदलत आहे.ही संविधानाची किमया आहे. काळाची महिमा आहे.. उद्याच्या भारताची छबी आहे …! चर्मकार समाजातीलच तरूणांनी नव्हे तर सर्वानीच हा आदर्श घ्यावा . औदासीन्य झटकून नव्या काळाचे नव उन्मेषाचे नवे फुलारे आत्मसात करावेत.पद्मश्री अशोक खाडे व आमदार सुरेश खाडे परिवारांचे जीवन आणि कार्य हे ह्या दृष्टीने दिशादर्शक आहे.राष्ट्रीय चर्मकार महासंघ व भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने पद्मश्री अशोकजी खाडे यांचे मनभावन अभिनंदन व शुभेच्छा..! जय रविदास

.                          लेखक,अँड.आनंद गवळी.

राष्ट्रीय उपाध्यक्ष-राष्ट्रीय चर्मकार महासंघ/भारतीय दलित साहित्य अकादमी-महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष


57
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!