आंदोलक विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी संत रोहिदास नवपरिवर्तन सेना आणि जनता प्रभाव न्यूजचे कायदेविषयक सल्लागार ॲड. नितीन सातपुते यांचा पुढाकार


पात्र विद्यार्थ्यांना विनामूल्य न्यायालयीन कायदेशीर सहाय्य; समाजसेवक नवीन रा. लाडे यांचा समन्वय

मुंबई | प्रतिनिधी | जनता प्रभाव न्यूज-: आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या आणि स्वतःवर अन्याय झाल्याचा दावा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी संत रोहिदास नवपरिवर्तन सेना आणि जनता प्रभाव न्यूजचे कायदेविषयक सल्लागार ॲड. नितीन सातपुते यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. पात्र विद्यार्थ्यांना विनामूल्य न्यायालयीन कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली असून, या उपक्रमाच्या समन्वयाची जबाबदारी समाजसेवक नवीन रा. लाडे यांनी स्वीकारली आहे. न्याय हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून, कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये आणि त्याला कायद्याच्या चौकटीत न्याय मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. पात्र विद्यार्थ्यांना कायदेशीर सल्ला, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, न्यायालयीन प्रतिनिधित्व आणि संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेत आवश्यक ते सर्व कायदेशीर सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या न्यायसहाय्य मोहिमेत ॲड. शोभा बुद्धिवंत, ॲड. मनाली गवळी, ॲड. रचित सिंग, ॲड. दयानंद उबाळे, ॲड. दानिश सय्यद, ॲड. सिद्धांत सारवडे, ॲड. नंदकुमार पाल, ॲड. किशोर ढोके, ॲड. नवनीत आडसुळ, ॲड. धर्मजीत खरात, ॲड. भूषण बेंद्रे, ॲड. महेंद्र भिंगारदिवे, ॲड. एजाज नकवी, ॲड. नेहा सातपुते, ॲड. सोफिया अन्सारी आणि ॲड. अभिषेक बांदेकर यांचा सहभाग असून, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

🟥 विशेष-: विद्यार्थ्यांना मिळणारी मदत

✔️ विनामूल्य कायदेशीर मार्गदर्शन

✔️ न्यायालयीन प्रतिनिधित्व

✔️ कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता व मार्गदर्शन

✔️ न्यायालयीन प्रक्रियेत आवश्यक ते सर्व सहकार्य

🟦 ॲड. नितीन सातपुते म्हणाले…> “न्याय हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. पात्र विद्यार्थ्यांना कोणतेही मानधन न घेता कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. न्यायासाठीचा हा लढा कायद्याच्या चौकटीत राहून लढला जाईल.”

🟨 समाजसेवक नवीन रा. लाडे यांची भूमिका > “विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू झालेल्या या उपक्रमात सामाजिक आणि कायदेशीर पातळीवर आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. न्याय मिळेपर्यंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.”

📞 संपर्क-: ॲड. नितीन सातपुते : ९३२३०६४२१६

समाजसेवक नवीन रा. लाडे : ९३७२२९९२९४

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 

जनता प्रभाव न्यूज-:आवाज लोकशाहीचा!! प्रभाव जनतेचा!!!


81
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!