आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीची डॉ. शेख दापांत्याकडे महत्वपूर्ण जबाबदारी


आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीची डॉ. शेख दापांत्याकडे महत्वपूर्ण जबाबदारी

​प्रतिनिधी | बीड-:आयुष (AYUSH) क्षेत्रातील डॉक्टरांच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या ‘आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन’ च्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भूषण नगरे सर यांनी डॉ. शेख असलम यांची राज्य अध्यक्षपदी , तर डॉ. सानिया असलम शेख यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड केली आहे.​विशेष म्हणजे, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या या पती-पत्नी जोडीची एकाच वेळी राज्यस्तरावरील महत्त्वाच्या पदांवर निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.डॉ. भूषण नगरे यांनी या निवडीची घोषणा करताना सांगितले की, आयुष डॉक्टरांचे संघटन बळकट करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी ऊर्जावान नेतृत्वाची गरज होती. डॉ. शेख असलम यांचा दांडगा जनसंपर्क आणि डॉ. सानिया शेख यांचा संघटनात्मक कार्याचा अनुभव लक्षात घेता ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.आपल्या निवडीनंतर बोलताना डॉ. शेख असलम म्हणाले, “संस्थेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्रातील प्रत्येक आयुष डॉक्टरला संघटनेशी जोडणे आणि त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट राहील.”

तर डॉ. सानिया शेख यांनी महिला डॉक्टरांच्या सहभागावर आणि सक्षमीकरणावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले.एकाच घरात दोन महत्त्वाची पदे आल्याने वैद्यकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. या निवडीबद्दल संघटनेचे पदाधिकारी, विविध रुग्णालयांचे संचालक आणि समाजसेवकांनी या दांपत्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. आगामी काळात ही जोडी राज्यातील आयुष डॉक्टरांच्या हितासाठी मोठी क्रांती घडवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पटेल परिवार कडुन पण जोरदार सत्कार करण्यात आला आहे !


62
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!