७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नंदुरबार येथे राष्ट्रप्रेम, शिस्त आणि कर्तव्यभावनेचा जागर!


७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नंदुरबार येथे राष्ट्रप्रेम, शिस्त आणि कर्तव्यभावनेचा जागर!

 

नंदुरबार-: भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय, नवीन कवायत मैदान, नंदुरबार येथे भव्य व शिस्तबद्ध ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या तुकड्यांनी आकर्षक व शिस्तबद्ध संचलन सादर करत देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि शौर्याचे प्रभावी दर्शन घडवले. यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. तसेच बालविवाह प्रतिबंधक शपथ उपस्थित सर्वांना देण्यात आली. राष्ट्रप्रेम, शिस्त आणि कर्तव्यभावनेचा जागर करणारा हा प्रजासत्ताक दिन अत्यंत गौरवशाली वातावरणात साजरा झाला.

 

या सोहळ्यास नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, नंदुरबार जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस, खासदार ॲड. गोवाल पाडवी, विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी, विधानसभा सदस्य अमशा पाडवी, विधानसभा सदस्य राजेश पाडवी, माजी आमदार इंद्रसिंघ वसावे, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, शाळेतील विद्यार्थी, नागरिक तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


57
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!