मुंबई-: आर. पी. आय. (आठवले) गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री अविनाशजी महातेकर यांनी पक्ष अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले दौऱ्यावर असल्यामुळे आज दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील के. ई. एम. रुग्णालयास १०० वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल शताब्दीमोहोत्सव वर्षा निमित्त भेट दिली.
के. ई. एम. रुग्णालय डॉक्टर. डीन मॅडम यांची यावेळी भेट घेतली आणि रुग्णालयातील रुग्ण व रुग्णालयाचा आढावा घेतला रुग्णालयच्या डी एन मॅडम यांनी माजी मंत्री.अविनाश महातेकर यांना पुष्पगुच्छ देऊन यावेळी सन्मानित केले. या प्रसंगी माजी मंत्री अविनाश महातेकर यांच्यासोबत उपस्थित आर पी आय (आठवले) गटाचे शिक्षक पदवीधर मतदार संघाचे प्रदेशाध्यक्ष घनश्याम चिरणकर, नेते सुनील मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Views: 456







