छोटा सायन रुग्णालयात रुग्णांची फरफट रुग्ण दगावल्यास जबाबदारी कोणाची?


oplus_0
oplus_0

ईश्वर ताथवडे-:लोकमान्य टिळक रुग्णालय हे जगप्रसिद्ध असून मुंबईत प्रथम दर्शनी प्रवेश करताच लोकमान्य टिळक रुग्णालय सायन येथे रुग्णसेवेसाठी उपलब्ध मिळते या रुग्णालयात सायन जवळील अँटॉप हिल, वडाळा, माटुंगा, इत्यादी परिसरातील आणि मुंबई बाहेरील रुग्णांसमवेत धारावीतील रुग्णांची जास्त प्रमाणात नोंद असल्यामुळे आजही या रुग्णालयात रुग्णांना अपुऱ्या सुविधा मिळत आहेत त्यामुळे धारावीतील रुग्णांसाठी छोटा सायन नावाने धारावीतील ६० फुटी मार्गांवर उभारणी करण्यात आली त्यामुळे धारावीतील रुग्णांना वैद्यकीय सेवेसासाठी बाहेर जाण्यासाठी वेळ लागून प्राण गमावावे लागू नये आणि स्थानिक पातळीवर चांगल्या प्रकारे धारावीकरांना वैद्यकीय सेवा मिळावी हाच उद्देश बृहन्मुंबई महानगर पालिका प्रशासनाचा असावा म्हणून हे रुग्णालय चालू करण्यात आले आणि त्यास धारावीकरांनी ही चांगलाच प्रतिसाद दिला असला तरी धारावी विधानसभा निवडणूक चार वेळा निवडून आलेल्या माजी आमदार व दोन वेळा कॅबिनेट मंत्रिपद भूषविलेल्या सद्याच्या मुंबई उत्तर मध्य खासदार वर्षा गायकवाड यांनी याच छोटा सायन रुग्णालयाचे त्यांचे दिवंगत वडील तथा माजी खासदार मुंबई दक्षिण मध्य एकनाथ गायकवाड यांचे नाव लोकनेते एकनाथ गायकवाड नागरी आरोग्य केंद्र असे देवून नामकरण केले असले तरी या रुग्णालयाच्या कारभाराकडे कोणाचेही लक्ष नसल्याचेच दिसून येत असून या रुग्णालयात फक्त एकच वेळ सकाळी ११ वाजेपर्यंत नविन केसपेपर मिळत असल्याने धारावीतील रुग्ण हवादील झालेत हे रुग्णालय फक्त नामधारी आहे की खरोखरच धारावीतील रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे? असा प्रश्न समस्त धारावीकरांना पडला आहे त्याचे कारणही तसेच आहे एकतर सायन रेल्वे स्टेशन जवळील मार्ग बंद होऊन आज जवळपास दोन वर्ष होत आलेत त्यामुळे ९० फूट मार्गे व ६० फूट मार्गे धारावीकरांना छोटा सायन रुग्णालयच जवळ पडत आहे तर सायन रेल्वे स्टेशन मार्ग बंद असल्याने या ९० फूट व ६० फूट दोन्ही मार्गांवर वाहतूक कोंडीची समस्या मोठया प्रमाणात दररोज होते यामुळे धारावीतील रुग्णांना लोकमान्य टिळक रुग्णालय सायन येथे वेळेत पोहचणे अशक्य होत आहे तर याच वाहतूक कोंडीतून लोकमान्य टिळक रुग्णालय येथे मार्गक्रमण करत असतांना आत्यावश्यक परिस्थितीतून प्राण गमावण्यास क्षणाचाही अवकाश पुरेसा असल्यामुळे यास जबाबदारी कोणाची ? असाही प्रश्न धारावीकरांमध्ये उपस्थित राहिला असल्याने धारावीकरांकडून छोटा नामधारी सायन रुग्णालय येथे बाह्यरुग्ण सेवा केस पेपर वेळ स्टाफ व इतर अत्यावशक सेवा वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात चर्चा चालू असून याकडे बृहन्मुंबई महानगर पालिका प्रशासन व स्थानिक नेते मंडळी जातीने लक्ष देवून धारावीकरांची काळजी घेणार आहेत की निवडणूका झाल्या आता धारावीकरांनो शोधा आपल्या वाटा अशी परिस्थिती राहणार याकडे समस्त धारावीकरांचे लक्ष वेधले आहे.


62
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!