प्रभाग क्रं १८४ च्या पडद्यावरच्या नगरसेविका पडद्या आड, तर पडद्या मागचा माजी नगरसेवक फलकावर (बॅनरवर)…!!


प्रभाग क्रं १८४ च्या पडद्यावरच्या नगरसेविका पडद्या आड, तर पडद्या मागचा माजी नगरसेवक फलकावर (बॅनरवर)…!!

मुंबई-:नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत अनेक राखीव जागा महिलांसाठी प्रधान्याने ठेवल्या जरी असल्या तरी निवडणुकीत विजयी महिला उमेदवार यांचे आपणास विविध ठिकाणी फलक (बॅनर ) लावलेले पाहवयास मिळालेच असतील पण धारावी विधानसभा प्रभाग क्रमांक १८४ महिला राखीव असला तरी देखील या निवडणुकीत माजी नगरसेवक हाजी बब्बू खान यांच्या पत्नी साजिदा बी बब्बू खान विजयी झाल्या असून त्यांच्या विजयी अभिनंदन बाबत सर्वत्र फलक (बॅनर) लावण्यात आले आहेत पण त्या फलक (बॅनर) मध्ये प्रत्येक ठिकाणी नगरसेविका साजिदा बी बब्बू खान यांचा फोटोच नाही तर चक्क माजी नगरसेवक बब्बू खान यांचाच फोटो ठीक-ठिकाणी झळकत आहेत. त्यामुळे आधीच निवडणुकीत प्रचाराला देखील बब्बू खान यांच्या पत्नी दिसल्या नसल्याबाबत धारावी विभागात नागरिकांमध्ये चर्चा चालू असल्याचे समजते तर दुसरीकडे “पडद्यावरची नगरसेविका नावापुर्तीच दाखवली जाते पण पडद्या मागचाच नगरसेवक फलक बॅनरवर झळकत आहे” त्यामुळे हा प्रभाग फक्त नावापुरताच महिलांसाठी राखीव होता का? की नागरिकांची बृहन्मुंबई महानगर पालिका आणि निर्वाचन आयोगाकडून दिशाभूल केली जाते का? जर निवडणुकीत महिला उमेदवार विजयी झालेल्या आहेत आणि त्याठिकाणी जर त्या विजयी उमेदवाराचा फोटोच दिसत नाही फक्त पतीदेवच दिसत आहेत तर मनपा निवडणुकीत नाम निर्देशन कोणाचे झाले होते? किंवा मनपा व निर्वाचन आयोग हा प्रभाग पुरुष म्हणून घोषित करून पुनर्निवडणूक घेणार आहेत का? की पत्नी नगरसेविका म्हणून नामधारी आहेत का? म्हणून अनेक प्रश्नांनी प्रभागात जागा निर्माण केली असून जसे “पडद्यावरची नगरसेविका पडद्या आड झाल्या आहेत..!! आणि पडद्या मागचा नगरसेवक फालकावर (बॅनरवर)..!! झळकत आहेत त्याचप्रमाणे प्रभागातील कामही पडद्या आड होणार असल्याचे दिसून येत आहे तर नगरसेविका पडद्या आड होणे आणि त्याजागी कोणीही असो अशी दुसरी व्यक्ती दर्शविणे हे कायद्यात बसते का? ज्या नगरसेविका निवडून आल्या आहेत त्याच जर पडद्या आड होत आहेत तर प्रभागातील कामे कसे होणार? जर असे असेल तर पडद्या आड राहणाऱ्या नगरसेविका नकोत अशी सर्वत्र चर्चा चालू असून प्रभागातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.


57
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!