कल्याण ते आळेफाटा मार्गांवरील एस टी बससेवा दुरावस्थेत अपघात झाल्यास जबाबर कोण
आळेफाटा-: कल्याण ते आळेफाटा माळशेज घाट मार्गे धावणाऱ्या एस टी बससेवा दुरावस्थेत आहेत त्यातच अतिशय नागमोडी वळणे असलेला माळशेज घाट आणि त्यातच मोबाईल नेटवर्क देखील या परिसरात नसल्यामुळे जर का या परिसरात अपघात झालाच तर मदत मिळवणे अतिशय जिकरीचे झाले आहे विशेष म्हणजे या मार्गांवर लाखो प्रवासी प्रवास करत आहेत पण एस टी महामंडळ त्याच जुन्या बसने प्रवासी सेवा देत आहे तेही ठीक आहेच परंतु या एस टी बसेस अतिशय घाईला आलेल्या निदर्शनास आलेल्या आहेत
वेळेवर या बसेसची कोणत्याही प्रकारे सर्व्हिसिंग होत नाही ना डागडुजी होत त्यामुळे एकदम आरामात आपल्याकडे वेळच वेळ असेल तर या मार्गांवरील एस बसने प्रवास करावा त्या सोबतच विमा सुरक्षा ही असावी तर घरातील सदस्यांना घरी आलो तर तुमचा असा संदेश देऊनच या बसने प्रवास करणे हितावह ठरेल
कारण या बसेस कुठेही बंद पडत आहेत तर कुठे अपघात होत आहेत तर या बसेसना दिवे सुद्धा नसल्याचे उघड झाले आहेत त्यामुळे एस टी बस चालकाला देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे आपले व परिवाराचे जीवन व्यथित करण्यासाठी माणूस नोकरी करत आहे पण घरी परण्याची कोणत्याही प्रकारे शाश्वती देता येत नाही स्वतःचा जीव मुठीत धरून जवळपास ५० ते ६० प्रवाशांची जबाबदारी पेलवत एस टी बस चालक दररोज या मार्गांवरून तारेवरची कसरत करत आहेत पण याच दरम्यान एखादा मोठा अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली तर याची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे का? असा प्रश्न प्रवाशांकडून केला जात आहे.
दिनांक १ मे २०२६ रोजी अहिल्यानगर ते विठ्ठलवाडी एस टी बस क्रमांक एम एच २०बी एल२९६२ ला माळशेज घाटात आळेफाटाकडे जाणाऱ्या एस टी बसने चुकीच्या रांगेत येत धडक दिली यात यात विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला परंतु बसची समोरील कचेला तडे गेले व उजव्या बाजूचे घसरा बसल्याने नुकसान झाले यात यावेळी माळशेज घाटात कोणाच्याही मोबाइलला नेटवर्क नसल्याने बस चालकाला विठ्ठलवाडी बस आगारातील अधिकारी डी एम राहुल कुंभार यांच्याशी वेळीच संपर्क होवू शकला नाही टोकावडे पुढे बस गेल्यानंतर मोबाइलला नेटवर्क आल्यानंतर बस चालकाने संपर्क साधला असता डी एम राहुल कुंभार यांनी बस आहे तिथेच थांबवून प्रवाशांना दुसऱ्या बसने महामार्गांवरून पाठविण्यास सांगितले त्यावेळी सर्व प्रवाशी संतप्त झाले होते कारण बस मध्ये जेष्ठ नागरिक, महिला व लहानमुलं प्रवास करत होते ऐनवेळी अंधारात प्रवाशांना होणारा अतोनात त्रास लक्षात घेत याच बस मधून जनता प्रभावचे संपादक ईश्वर ताथवडे यांनी डी एम राहुल कुंभार यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली असता डी एम राहुल कुंभार यांनी बस मुरबाड बस आगारापर्यंत नेवून प्रवाशांची सुविधा करून देण्यासाठी बस चालकांना सूचित केले पण याच बसला दिवे सुद्धा नसल्याने बस चालकास तारेवरची कसरत करावी लागली आहे त्यामुळे पुन्हा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती तर याच प्रमाणे अनेक बसेस दिवे नसल्याने अतिरिक्त दिवे लावून प्रवाशांची वाहतूक करत असल्याचे ही दिसून आले आहे यात प्रवाशी बसभाडे देऊनही सुरक्षित नाहीत यात दोष कोणाचा? अशा हालगर्जी पणामुळे प्रवाशी खाजगी प्रवाशी वाहतूकीकडे वळण्यास मजबूर कोण करत आहेत.? कि एस टी महामंडळ देखील खाजगी करणाकडे वळविण्याचा हा ऱ्हास आहे का? असा देखील प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.







