आज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनानिमित्त !!📰
०३ मे २०२६
आपले पत्रकार म्हणजेच…….
जा=गृती जनमानसात निर्माण करणारे
ग=तीने घटना स्थळी पोहचणारे
ति=थून पुढे अथकपणे बातमी देणारे
क=धीही कोठेही घटना स्थळी धावणारे
असे आपले मराठी पत्रकार !! १ !!
वृ=त्तपत्राला प्रथम प्राधान्य देणारे
त्त=र ला योग्य न्याय देणारे
प=हिल्या पानांपासून वाचणीय करणारे
त्र=स्त असूनही समाधानी दिसणारे
असे आपले मराठी पत्रकार !! २ !!
स्वा=गत नवे सदर करणारे
तं=त्रज्ञान विकसित असूनही पेन वापरणारे
त्र्य=लयकारी लोकांना न्याय मिळवून देणारे
असे आपले मराठी पत्रकार !! ३ !!
दि=वाळी- होळी साजरा न करणारे
न=कळत वृत्तसेवेने समाजकार्य करणारे
असे आपले मराठी पत्रकार !! ४ !!
आपल्या भारतीय लोकशाहीतील वृत्तपत्रकाच्या चौथा स्तंभाचा,विजय असो ! 👍
आज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य ३३वा दिनाच्या माझ्या मित्र- मैत्रिण निर्भीड पत्रकारांना हार्दिक हार्दिक मनःपूर्वक ‘वृत्तमय’ अभिनंदनऽऽऽ !! 🤝🌹आणि आपणास, आपल्या मनातल्या पत्रकाराला मनःपूर्वक ‘वाचनीय’ शुभ शुभेच्छाऽऽऽ !! 🗞️ लेखक-:विलास देवळेकर

