दुखवट्याच्या कालावधीत सुनेत्रा ताईंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास नकार दिला असता तर ते योग्य ठरले असते.-ऍड.नारायण गायकवाड


दादांचा मृत्यु नैसर्गिक नाही. अपघात नसून घातपात आहे. चौकश्या सुरू आहेत.

पोलिस गुन्हा नोंदविण्यास स्पष्टपणे नकार देत आहेत.दिवसेंदिवस संशयास्पद वातावरण निर्माण होत आहे.त्यांच्याच पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांकडे संशयाची सुई दाखवली जात आहे. याच संशयास्पद नेत्यांनी कधीच सी.बी.आय. चौकशीची मागणी केली जात नाही.अतिशय गुढरीत्या सगळ्या घटना घडत आहेत. या सर्व पार्श्वभूमीची सुनेत्रा ताईंना कल्पना असेलच…या प्रसंगी त्यांचे मौन अनाकलनीय आहे. त्यांनी आता मैदानात उतरून परखड भूमिका घेतली पाहिजे.. अलिकडच्या काळात दादांनी अतिशय परखड, ज्वलंत आणि निर्भिड भूमिका घेऊन अनेक राजकीय मंडळींच्या फाईल्स बाहेर काढून त्यांना जनतेच्या चव्हाट्यावर आणण्याची घोषणा केली होती..तो एक मोठा बॉम्ब होता. त्यात अनेक जण अडकले असते…हे सत्य आहे.त्यावेळी दादांच्या विरोधात मंत्री बावनकुळे यांची प्रतिक्रिया अतिशय धुर्त‌‌‌ आणि इशारावजा होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली होतीच..!! या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार हे समर्थपणे किल्ला लढवत आहेत. त्यांना अनेक आमदार..कार्यकर्ते यांचा भक्कम पाठिंबा आहे. पण दादांच्याच पक्षातील चांडाळ चौकटी काहीच बोलत नाहीत.यावरून अंदाज बांधा..ही चौकशी सुरू असतानाच त्याला अनेक फाटे फोडून त्याचे गांभीर्य नष्ट करतील.सरकार काहीही करू शकते.सी.आय.डी., सीबीआय, ए.डी.आयकर खातें कोणाच्या आदेशानुसार चालते ?  खरे-खोटे न्यायालय बघेल. पण वरील संस्थांना कटपुतळी सारखे नाचवणारे बीजेपी सरकार आहे…हे विसरून चालणार नाही.दोन दिवसांपूर्वी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहका-यांची भ्रष्टाचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आहे. मे. सत्र न्यायाधीश महोदयांनी सीबीआय.च्या अधिका-यांच्या विरोधात कठोर ताशेरे ओढले. त्यांच्या विरोधात सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले. केजरीवाल यांच्याविरोधात केलेले आरोप हे खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित होवून केले होते..हे सिद्ध झाले आहेत.राज्यकर्त्यांना राज्य चालवायचे असते.त्यासाठी ते कोणत्याही थराला जावू शकतात. जो विरोध करतो; त्याला संपवितात… अजित दादांच्या बाबतीत तसे झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. यांची प्रचिती रोहित पवार यांनी स्पष्टपणे केलेल्या आरोपांमुळे येते. मृत्युच्या दोन महिने आधी दादांनी सरळ-सरळ सत्तेतील काही धेंड्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात काही फाईल्स काढण्याची धमकी दिली होती…हे लक्षात घ्या.

शेवटी काय!!!!

सत्तेतील राजकारणी मंडळींचे कपटी, धुर्त, पाताळयंत्री आणि मुरब्बी डावपेच प्रत्यक्ष देवालाच समजत आणि उमजत नाहीत.. ..

हेच अंतिम सत्य आहे.

                                    ऍड.नारायण गायकवाड

                                              ९८१९७७०१८९


57
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!