धारावीत मतदार राजा जागा हो एकात्मिक विकासाचा राजा हो गर्जना
मुंबई-:दिनांक २५ जानेवारी रोजी मतदार जनजागृती दिवस त्यानिमित्ताने मतदाराला धारावी नागरिक समितीचे संपर्क सचिव दिलीप गाडेकर यांनी विनंती केली आहे की झाले इलेक्शन बिघडू नका रिलेशन असे म्हणत धारावीतील विविध सात प्रभागातून विविध जाती धर्माचे पक्षाचे उमेदवार निवडून आले असून त्यांना विश्वासात घेऊन धारावीच्या पुनर्विकासाकडे लक्ष वेधू इच्छितो खूप झाले वॉटर मीटर गटर पण खऱ्या अर्थाने डी.आर.पी. प्रकल्प किंवा एस. आर. ए. डेव्हलपमेंट अथवा लोकांनी एकत्र येऊन स्वयंविकास साधने यासारख्या महत्त्वाच्या समस्याकडे मतदारांनी लक्ष द्यायला हवं आणखीन किती वर्ष या धारावीच्या घाणीत चाचपड पडणार आहोत त्यापेक्षा दक्ष जागृत मतदारांनी निवडून आणलेले नगरसेवक आणि आमदार लोकप्रतिनिधी यांना एकत्र करून खऱ्या अर्थाने धारावीचा सर्वांगीण पुनर्विकास करिता दबाव गट निर्माण करून विकासाच्या मार्गावर सुरुवात केली पाहिजे पुन्हा तेच तेच गटार लादीकरण कच्चे रस्ते स्वच्छ शौचालय नादुरुस्त उद्याने गार्डन धूळ प्रदर्शन खराब बाजार-हाट उघडी गटारी कचरा पेट्या यासारख्या प्रश्नाकडे नगरसेवक लक्ष देतील पण जागृत मतदारांनी स्वयं पुनर्वसन किंवा एस आर ए मार्फत पुनर्वसन यासारख्या बाबींकडे संघटित रित्या लक्ष घालून पाठपुरा करून लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन धारावीच्या विकासाकडे लक्ष केले पाहिजे तर आणि तरच धारावीचा पुनर्विकास होणे शक्य आहे अन्यथा येरे माझ्या मागल्या पुन्हा पाच वर्ष त्या घाणीत त्या समस्येत अडकून राहायला पडेल कृपया सरकारच्या विकास योजनेत लोकप्रतिनिधी बरोबर मतदारांनी एकत्र राहून विकास प्रक्रियेत जागृतपणे आपल्या हक्कासाठी लढायला हवे लढलात तर वाचाल अन्यथा धारावी बाहेर फेकले जाईल याचा विचार सुज्ञ जनता मतदारांनी वेळीच करायला हवा कारण गेली तीस वर्ष पुनर्विकासाचा जो खेळ चाललाय तो थांबवायला हवा अन्यथा पुढील काही वर्ष याच खेळात आपण सर्व अडकून पडू काळजी घेऊया विकासासोबत बेरजेचे राजकारण करून धारावीचा पुनर्विकास करूया धन्यवाद मतदार राजा जागा हो एकात्मिक विकासाचा राजा हो अशा गर्जना यावेळी देण्यात आल्या.







