मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी/उत्तर’ विभागात भ्रष्टाचाराची नांदी अधिकाऱ्यांची होते चांदी!!


मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी/उत्तर’ विभागात भ्रष्टाचाराची नांदी अधिकाऱ्यांची होते चांदी!!कामगारांना भरपगारी सुटी देत गर्दुल्यांकडून सफाई करून घेतली जाते.!!कष्टाने काम करणाऱ्या प्रामाणिक कामगारांचे आणि करदात्या मुंबईकरांच्या पैशांचे शोषण मनपा थांबवणार कधी?

मनपा अधिकारी गर्दुल्यांकडून साफ-सफाई करून घेत आहेत तर त्यांना कायमस्वरूपी मनपा कामगार म्हणून ठेवणार आहे का ?मुंबई-: सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी/उत्तर’ विभागांतर्गत येणाऱ्या माहीम व दादर परिसरात स्वच्छतेच्या नावाखाली मोठा आर्थिक घोटाळा आणि गैरप्रकार सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. महापालिकेचे अधिकारी आपल्या हक्काच्या सफाई कामगारांकडून पैसे घेत त्यांना भरपगारी आराम देत असून, त्याऐवजी रस्त्यावरील अमली पदार्थ सेवन करणाऱ्या (गर्दुल्या) व्यक्तींकडून अल्पमानधनावर साफसफाई राजरोसपणे करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. नेमका प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार, माहीम व दादर घनकचरा विभागातील सफाई अधिकारी – “राधिका अहिरे/साळवी” यांच्या दादर- घन कचरा व्यवस्थापण चौकी येथे हा प्रकार सर्रास सुरू आहे.जे कामगार पालिकेच्या ‘मस्टरवर अधिकृत आहेत, त्यांना ड्युटीवर न बोलवता काही भ्रष्ट अधिकारी त्यांच्याकडून हजेरी लावण्यासाठी पैशांची मागणी करतात.या बदल्यात कामगारांना कामावर न येण्याची सवलत दिली जाते.

मात्र,रस्ते तर साफ होणे गरजेचे असल्याने, या कामासाठी महापालिकेचे अधिकृत कर्मचारी नसलेल्या बाहेरील व्यक्तींना,विशेषतः परिसरातील गर्दुल्यांना पकडून आणले जाते. त्यांना पालिकेच्या अधिकृत पगारापेक्षा अत्याल्प मानधन देवून रस्ते झाडण्याचे काम दिले जात आहे.

या भागात नियमित गैरप्रकार

स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार,खालील परिसरात हे ‘अनधिकृत सफाई कामगार’ रोज काम करताना दिसतात माहीम स्टेशन परिसर. सेनापती बापट मार्ग, भवानी शंकर मार्ग ,आगाशे पथ ,मीना ताई फुल मार्केट “सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न”

महापालिकेचे काम हे जबाबदारीचे असते,मात्र कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय आणि सुरक्षेच्या साधनांशिवाय या गर्दुल्यांकडून कचरा उचलला जात आहे.यामुळे एकीकडे पालिकेच्या शासकीय तिजोरीवर डल्ला मारला जात आहे,तर दुसरीकडे कामाच्या गुणवत्तेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.कष्टाने काम करणाऱ्या प्रामाणिक कामगारांचे आणि करदात्या मुंबईकरांच्या पैशांचे हे सरळ सरळ शोषण आहे.

> असे मदमस्त अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही जुमानत नाहीत त्यांच्या सूचनांचे देखील पालन करीत नाहीत,कारण वरिष्ठ आधिकाऱ्यांनी अनेक मेमो त्यांना दिले आहेत.पण त्यांच्या उद्धट वागणुकीमुळे त्या वरिष्ठांना जुमानत नाहीत.

प्रभागातील नगरसेवक यांनी अनेक वेळा या बाबत तक्रारी दिल्या आहेत, स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होवून दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी,”अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

वर्षानुवर्षे एकाच कार्यालयात काम केल्यामुळे या अधिकाऱ्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्याचे कारणही तसेच आहे,

गेले पाच सहा वर्षे हे अधिकारी एकाच ठिकाणी स्थायिक स्वरूपात काम करतांना दिसत आहेत, शासकीय नियमानुसार दर तीन वर्ष व त्यानंतर दुसऱ्या वॉर्ड मध्ये बदली होते, पण तीन वर्ष अधिक कालावधी उलटून देखील संबंधित अधिकाऱ्यांची बदली होत नाही आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये विविध शंका निर्माण झाल्याने जी/उत्तर प्रभागातील अनागोंदी कारभारा बाबत चर्चा होत आहेत. तर कामगार यांनी सुद्धा सफाई अधिकारी राधिका अहिरे यांची रस्ते झाडू मारण्यासाठी फिक्स केल्याबद्दल प्रत्येकी कितीतरी पैसे घेतल्याची तक्रार केली आहे व तसेच सदर महिला कर्मचारी कामावर स्वतः विभागात कधीच हजर नसते, हजेरी लावून कुठे तरी निघून जातात,व हाताखालच्या मुकादम आणि कामगारांना अपमानास्पद वागणूक देतात, अरेरावीची भाषा करतात,जे काम करतात त्यांच्या खोट्या तक्रारी करतात, त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा त्यांच्या या

वागणुकी बाबत तक्रारी केल्या आहेत. तसेच बांधकाम विकासक,पाणी टॅन्करवाले, गाडी धुणारे,भाजी व्यवसायिक यांच्या कडून हप्ते गोळा करत असलेल्या स्वरूपाच्या तोंडी तसेच लेखी स्वरूपात अनेक वेळा उच्च अधिकाऱ्यांना तक्रारी दिलेल्या आहेत,.. तसेच युनियनकडे ही या महिला अधिकाऱ्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत,

या शिवाय वॉर्ड मधील काही अधिकाऱ्यांची विभागातील बांधकाम विकासाच्या कडून प्रति माह १०,०००₹ घेणे,अशी तक्रार नागरिकांनी देखील केलेली आहे, त्यामुळे विकासक नागरिकांना जुमानत नाहीत,महानगर पालिकेच्या नियमानुसार दर तीन वर्षांनी बदल्या करण्यात येत नसल्याने भ्रष्टाचार बोकाळला असल्याची नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात चर्चा होत असल्याने संबंधित भ्रष्ट अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई होणे अनिवार्य असून इतर ही असेच अनेक भ्रष्ट अधिकारी असण्याची शक्यता नाकारता येत नसून आतापर्यंत कोणकोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत हे सुद्धा तपासून पाहणे आणि का झालेल्या नाहीत याची ही शहानिशा होणे गरजेचे आहे.


82
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!