मुंबई-: संत रोहिदास समाज पंचायत संघ मुंबई. समाज कल्याण समिती आयोजित “संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांच्या ६५० वी. जयंती माहे” शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात, समाजाचे नेते आमदार मंगेश कुडाळकर उपस्थित होते. या जयंती शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष मयूर देवळेकर यांच्या शुभहस्ते “संत रोहिदास महाराज” यांच्या प्रतिमेला पुष्पकार अर्पण करण्यात आले. तसेच दिपप्रज्वलन रोहिदास समाज पंचायत संघाचे उपाध्यक्ष गणेश चव्हाण यांच्या समवेत माजी विश्वस्त विजय गोवळकर, संघ निवडणूक समिती अध्यक्ष जगदीश जळगावकर, संघ चिटणीस संतोष गोठणकर, चिटणीस सूर्यकांत दाभोळकर, महिला संघटन समिती अध्यक्षा अश्विनी प्रभुलकर, विभाग अध्यक्ष केशव पंदिरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात संघाचे उपाध्यक्ष गणेश चव्हाण, बळीराम सुसविरकर, संघ निवडणूक समिती अध्यक्ष जगदीश जळगावकर, यांनी उपस्थितांना जयंती निमित्ताने ‘शुभेच्छा’ दिल्या. तर काही मान्यवरांचे यावेळी ‘सत्कार’ करण्यात आले. सलोनी मयूर देवळेकर हिने उपस्थित बांधवांना आपल्या मुला मुलींना, समाज कार्यात सहभागी होण्यासाठी आव्हान करताना, समाजाकडे नवतरुण नव्या अपेक्षेने पहात आहेत. त्यासाठी ‘नवीन पिढीला व्यवसायासाठी आर्थिक मदत, फुकट न देता माफक व्याजदरात करावी. या वेळी “वधू वर सूचक समितीच्या (वेबसाईट)” संकेतस्थळाचे उद्घाटन आमदार मंगेश कुडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.आमदार मंगेश कुडाळकर यांनी “संत रोहिदास भवनसाठी लागणारी सर्व मदत केली जाईल, आणि ६५१ संत रोहिदास जयंती साजरी आपल्या ‘संत रोहिदास भवनातील’ प्रशस्त सभागृहात करण्यात येईल. असे आश्वासन दिले. अध्यक्ष मयूर देवळेकर यांनी मनोगत व्यक्त करताना, संत रोहिदास भवन बांधकाम बाबत ‘माहिती’ दिली. संत रोहिदास भवनाचा लोकार्पण सोहळा २०२६ मध्ये “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी” यांच्या हस्ते करण्यात येईल त्यासाठी आर्थिक निधी कमी पडत असून,समाजातील ‘आर्थिक सक्षम’ बांधवांना मदतीसाठी आवाहन केले.’शासकीय मदत’ मिळवण्यासाठी आमदार कुडाळकर यांच्या मदतीने प्रयत्न करीत आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सर्व पंचायत पदाधिकारी, सर्व विभाग अध्यक्ष-:पदाधिकारी, आजी-माजी विश्वस्त महिला मंडळ उपस्थिती लक्षणीय होती. आणि कवि. विलास देवळेकर व गायक- संगीतकार एकनाथ धयाळकर यांनी संगीतबद्ध केलेल्या “संत शिरोमणी रोहिदास महाराज” यांची गाणी सादर करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन समाज कल्याण समिती अध्यक्ष सुनील वायंगणकर यांनी केले.







