उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करा’-वकील नितीन सातपुतेंची मागणी


उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करा’-वकील सातपुतेंची मागणी

बारामतीमधील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात विमान अपघाताबाबत चिंता व्यक्त होत आहेत. दुसरीकडं या अपघाताबद्दल काही शंका वकील सातपुते यांनी व्यक्त केल्यात.

 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी सकाळी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या या अकाली निधनानं सर्वांनाच धक्का बसला असून देशभरात त्यावर हळहळ व्यक्त केली जातेय. विमान अपघात कसा झाला, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. अशातच अजित पवारांच्या विमान अपघातावरून वकील नितीन सातपुते यांनी काही गंभीर शंका उपस्थित केल्यात.

 

 

विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी – वकील नितीन सातपुते-अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करताना नितीन सातपुते यांनी म्हटलंय की, “अजित पवार यांचा विमान अपघात हा प्रथमदर्शनी संशयास्पद वाटतोय. या अपघाताची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि मानवी हक्क आयोगाकडून सखोल चौकशी होण्याची गरज आहे. या विमानात खरंच काही तांत्रिक समस्या होती की ते जाणीपूर्वक नादुरुस्त ठेवण्यात आलं?, किंवा यामागे काही घातपात किंवा राजकीय कटकारस्थान आहे का? या सगळ्याबाबतही सीबीआयकडून चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी वकील सातपुते यांनी केलीय.

कसा झाला विमान अपघात – जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे निघालेल्या अजित पवार यांच्या विमानानं सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबईतून बारामतीकरता उड्डाण केलं होतं. हे विमान 40 मिनिटांत बारामतीतील विमानतळाच्या जवळ पोहोचलं. परंतु विमान लँड होत असताना अखेरच्या क्षणी काहीतरी बिघात झाला. पायलटनं सुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्यांना अपयश आलं. हे विमान धावपट्टीवरून काही अंतर दूर जाऊन कोसळलं. या विमान अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार “पहिल्यांदा हे विमान गावावरुन गेलं, त्यानंतर पुन्हा गावावरून ते खाली येत असताना अचानक खाली जमिनीवर कोसळलं. मोठा स्फोट होऊन आगीचा डोंब उसळाला. स्फोट झाल्यानंतर दूरवर आमच्या घरापर्यंत या अपघातग्रस्त विमानाचे तुकडे उडाले,” असं एका महिला प्रत्यक्षदर्शीनं माध्यमांशी बोलताना सांगितलं.

 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील एक्स मीडियात पोस्ट करत अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली.

ब्लॅक बॉक्सची तपासणी होणार-बारामती विमान अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी या प्रकरणाची काळजीपूर्वक चौकशी केली जात आहे, असल्याचं पोलिसांनी बुधवारी सांगितलं. विमानाच्या धडकेचा वेग आणि कोन निश्चित करण्यासाठी अपघातस्थळी असलेल्या अवशेषांच्या जागेची आणि स्थितीची कसून तपासणी करून छायाचित्रे घेतली जाणार आहे. विमानाची उड्डाणादरम्यानची तांत्रिक स्थिती आणि ते उड्डाणासाठी योग्य होते की नाही, हे निश्चित करण्यासाठी ब्लॅक बॉक्सची तपासणी केली जाईल, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगमधून शेवटच्या क्षणी वैमानिकांमधील संभाषण आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती मिळेल, असे पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

 

विमानाची पार्श्वभूमी –कॅप्टन रोहित सिंह आणि व्ही. के. सिंह यांच्या मालकीच्या व्हएसआस कंपनीमार्फत हे विमान ऑपरेट केलं जात होते. लिअरजेट 45 या बनावटीचं हे विमान व्हीटी-एसएसके या गटात नोंदणीकृत होतं. यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 2 कर्मचारी (1 पीएसओ आणि 1 अटेंडंट) आणि 2 क्रू (पीआयसी+एफओ) सदस्य प्रवास करत होते.

 

राज्यभरातून शोक व्यक्त- भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अजित पवार यांच्यासह अपघातग्रस्त विमानामध्ये एकूण पाच जण प्रवास करत होते. मुंबई पोलीस दलातील सुरक्षारक्षक विदीप जाधव हे अजित पवारांच्या सोबतच बसले होते. याशिवाय विमानात सुमित कपूर (पायलट कॅप्टन), संभवी पाठक (कॅप्टन) आणि पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट) यांचाही मृत्यू झालाय.


57
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!