

धक्कादायक -: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात अजितदादांसह सहा जणांचा मृत्यू..!!

विमान लँडिंग करतांना आग लागून कोसळून हा अपघात झाला
अजितदादा पवार जिल्हा परिषदेच्या निवडणूक सभेसाठी बारामतीला रवाना झाले होते
बारामती-:राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे की अजितदादा पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग करतांना विमानाला आग लागून कोसळले यात अजितदादा पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आज सकाळी ८:१० वाजता मुंबईहून विमानाने बारामतीला जाण्यासाठी विमानाने उड्डाणं केलं आणि ८:४५ वाजता बारामती विमान लँडिंग करतांना आग लागून कोसळून हा अपघात झाला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार-“अजितदादा पवार जिल्हा परिषदेच्या निवडणूक सभेसाठी बारामतीला रवाना झाले होते” याच दरम्यान हा विमान अपघात झाला असून राज्यभरात शोककळा पसरली असून पवार कुटुंबियांसह राजकीय नेते मंडळी, कार्यकर्ते आणि विरोधी पक्ष नेतेही दुःखाच्या महासागरात असल्याने महाराष्ट्रात प्रत्येकाला अश्रू अनावर झाले आहेत. तर “सुप्रिया सुळे यांचे ही स्टेटस उद्धवस्त…”असे असून शरद पवार, सुप्रिया सुळे,अजितदादा पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या समवेत बारामतीला रवाना झाले आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही बारामतीला रवाना झाले असून इतर ही मंत्री व नेते बारामतीला रवाना होत असल्याचे समजते.







